Tuesday, 10 September 2013

आम्ही लोककलावंत - अजय-अतुल


                   गवळण, लावणी या अस्सल मराठी लोककलांसाठी मराठी मुलांना स्ट्रगल करावे लागत असेल तर त्यांच्या मराठीपणाचा काही उपयोग नाही, असे मत प्रसिद्ध गायक अजय - अतुल यांनी व्यक्त केले. आम्ही संगीतकार होण्याआधी लोककलावंत असल्याने, संगीतातील बिजे आम्हाला या मातीतून मिळाली ती शिकण्यासाठी जर आजच्या मुलांना पाटी, दप्तर घेऊन क्लासला जाण्याची गरज वाटत असेल तर, मराठी संगीताच्या वाटचालीबाबत प्रश्न चिन्ह निर्माण होईल असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
                   शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा राम कदम कलागौरव पुरस्कार अजय - अतुल यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आला. शाल, श्रीफळ, ५१ हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमास माजी खासदार श्रीनिवास पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, ज्येष्ठ संगीत संयोजक इनॉक डॅनियल, श्री संत दर्शन मंडळाचे श्रीराम साठे उपस्थित होते
                     मनापासून केलेली कोणतीही गोष्ट दुसऱ्याच्या मनाला जाऊन भिडते हेच आमच्या यशाचे गुपित आहे. असे सांगून, कुणाला इम्प्रेस करण्यासाठी संगीत केले नाही तर, मनाला जे भावेल ते करत गेलो. असे सांगून, म्युझिकल शॉपमध्ये रॉक, पॉप या गाण्यांबरोबर मराठी चित्रपट गीतांसाठी नविन रॅक उघडण्याचे स्वप्न असल्याचे अतुलने सांगितले. मराठी संगीताला गत वैभव मिळवून देणारी ही जोडी मराठी बरोबरच इतर ही भाषांमध्ये चांगले काम करीत आहे. हा मराठी मातीचा सन्मान आहे, असे पवार म्हणाले.

No comments:

Post a Comment