मुळ गाव?
-जन्म पुणे येथे झाला. अतुल थोरला भाऊ आणि मी (अजय) दोन वर्षांनी लहान. आम्ही दोनच भाऊ(सख्खे)
आई वडिलांची पार्श्वभूमी
-आई वडील अत्यंत गरीब परिस्थितीत होते. आमचीही तशीच होती. वडीलांना चार भाऊ तीन बहिणी. शिक्षणाचा फार ओढा घरात नव्हता. पण सर्वांमध्ये वडीलच शिकले.ग्रज्युएट झाले (शिक्षणाची जाण असल्यामुळे). नंतर सरकारी नोकरी स्वीकारली. वडिलांच्या लहानपणी ते आपल्या भावंडांबरोबर व चुलत भावंडांबरोबर लिंबू,मिरची, कोथिंबीर अशा वस्तू विकून घर चालविण्यास हातभार लावत असत. वडिलांचा एक भाऊ(थोरला) शाळेत जाऊन आला की मग वडील त्याचा शर्ट घालून शाळेत जायचे. अशी त्यांची मूळ परिस्थिती. आईच्या माहेरीपण प्रचंड गरीबी.आजोळी शेती हाच व्यवसाय असला तरी त्यात फार उत्पन्न होत नसे. आमचे मामा, आले पाकाच्या वडय़ा विकून घर चालवीत असत.
शालेय शिक्षण कुठपर्यंत झालायं?
-अतुलने वकिली म्हणजेच लॉ चे शिक्षण अर्धवट सोडले. तर मी बॉ. कॉम. चे शिक्षण अर्धवट सोडले. आयुष्यात संगीतात करीयर करायचे निश्चित असल्यामुळे. सांगितिक क्षेत्रात संधी मिळत गेल्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. संधी मिळाल्यानंतर काम स्विकारत गेलो, त्यातून थोडेफार पैसे मिळत असे (त्याची गरजही होती).
संगीत या क्षेत्राशी कधी संबंध आला?
-संगीत क्षेत्राची सुरुवात मी (अजय) कोरसमध्ये गाऊन केली आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे. दुसरीत तिसरीत असताना शाळेतल्या कवितांना चाली लावत होतो, पण चाल लावणे म्हणजेच संगीत देणं/संगीतकार होणे हे आम्हाला माहित नव्हते.
संगीत दिग्दर्शन करायचे कधी ठरवले?
-संगीतच करायचं हे लहानपणीच पक्के ठरविले होते.
आई वडिलांची प्रतिक्रिया काय होती?
-आई वडीलांचा संगीत व्यवसायासाठी पुर्ण पाठिंबा होता,परंतु आपल्याकडे घरात एक पद्धत असते ज्यानुसार मुलांची वयं 17 ते 20 वर्षे असताना ते नोकरी करत नाहीत, हे मात्र आम्हाला ऐकावे लागत असे, पण कालांतराने ते कमी झाले. कामं मिळत गेल्याने त्यांचाही आत्मविश्वास वाढत गेला आणि त्यानंतर आजतागायत आम्हाला भरपूर पाठिंबा दिला. संगीत देणं हे काम मनापासून करा आणि केवळ पैसे मिळणार म्हणून वाट्टेल ते काम स्वीकारू नका; असा सल्ला वडीलांनी दिला.
लहानपणाच्या आठवणी
-शाळेत असताना खूप कवितांना चाली दिल्या. साने गुरुजींची ‘देह मंदिर चित्र मंदिर एक तेथे प्रार्थना’, ‘टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले’, ‘या बाळांनो या रे या’. एक महत्त्वाची आठवण म्हणजे आम्ही शिरुरला असताना आमच्याकडे एक टेप रेकॉर्डर आणला आणि एकच कॅसेट आणली, बाबासाहेब देशमुखांचा पोवाडा. तो अतुलला पाठ झाला आणि मग शिरुरमध्ये कोणत्याही कार्यक्रमाला त्याला तो सादर करण्यास बोलवत असे, त्याला सर्व ‘बाल शाहीर’ म्हणू लागले. त्यामुळे शाळेत प्रार्थनेपासून ते कोणत्याही सांस्कृति कार्यक्रमांपर्यंत अगदी गॅदरींगसुध्दा सर्वच गोष्टींमध्ये आम्ही असायचो.महत्त्वाची आठवण म्हणजे शिरुरच्या विद्याधाम प्रशाला शाळेतून आम्ही जेव्हा राजगुरुनगरला महात्मा गांधी विद्यालय शाळेत गेलो तेव्हा त्या शिरुरच्या शाळेतील मुख्याध्यापकांनी राजगुरुनगरच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहिले की ‘‘आम्ही दोन हिरे तुमच्याकडे सुपुर्द करीत आहोत, त्यांचा योग्य सांभाळ करा, जोपासना करा’’ ही आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट होती.
आपल्या मते अमिताभ मोठा की आर. डी. बर्मन?
-नो कॉमेंट
आवडते संगीतकार कोणते?
-तसे सगळेच, पण लहानपणी बप्पी लहरी. नंतर लक्ष्मीकांत प्यारेलाल आवडायला लागले. आता मोठे झाल्यानंतर कळले मदन मोहन, खळे,बाबूजी, राम कदम, विश्वनाथ मोरे, वसंत देसाई, वसंत पवार, श्रीधर फडके असे अनेक. पाश्चिमात्य ऐकायला लागल्यानंतर मोझार्ट, विवाल्डी,सॅम्युएल बार्बर, जेरी गोल्डस्मिथ, हल झिमर आणि जॉन विलीयम्स् खूप ऐकले. हिंदुस्थानी म्हणायचे तर आर.डी. आणि ईलाई राजांचा प्रचंड प्रभाव आमच्यावर आहे. ए.आर. रहमानला आम्ही मानतो.
कोणात्या संगीतकाराचा आपल्यावर सर्वात जास्त प्रभाव आहे?
-जॉन विलीयम्स
संगीत दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट कोणता?
-गायब (हिन्दी)
तुम्ही दिलेली हीट गाणी इतरांच्या आवाजात ऐकल्यावर ती आपण गायला पाहिजे होती, असे वाटते का?
-आजिबात नाही
हिंदी चित्रपट संगीत व मराठी चित्रपट संगीत यात अधिक आव्हानात्मक काय वाटते?
-संगीतात आव्हानात्मक नसतं, चित्रपटातली परिस्थिती कशी आहे आणि त्यानुसार संगीत द्यायचय हे आव्हान असतं.
आयुष्यात आलेले अपमानाचे, आनंदाचे तसेच रागाचे दोन तीन प्रसंग सांगा!
-अपमान अनेकवेळा झाला. वाद्यांना हात लावू न देणं वगेरे. वाद्यांबद्दल आदर असूनसुध्दा असे अपमान अनेकवेळा झाले. आनंदाची गोष्ट एवढीच होती की आमच्या दोन्ही आज्यांच्या समोर बँड पथके होती त्यामुळे तिथे जाऊन ट्रम्पेट हातात घेणे, बेस ड्रम/ढोल वाजवायला मिळत असे.
एकमेकांपासून वेगळे होऊन काम करु शकाल का?
-प्रश्नच येत नाही. कामच काय पण काहीच करु शकत नाही.
एकमेकांचे प्लस व माईनस पॉईंट सांगा.
-अतुलचा प्लस प्वाईंट म्हणजे तो आग्रही आहे. आम्हाला जे पाहिजे ते तो कलाकारांकडून करवून घेतो. मी (अजय) संकोच करतो पण तो नाही. हा माझा माईनस प्वाईंट. अतुलचा माईनस प्वाईंट म्हणजे तो खुप लवकर रागावतो आणि मी फार रागवत नाही.
किती गाणी हीट झाली?
-रसिकांनी ठरवायचे.
गाडीत असताना मोबाईल बंद असेल तर कोणात्या संगीतकारांची/गायकांची गाणी ऐकता?
-आर. डी. आणि ईलाई राजा
आपापसात वादविवाद, भांडणे व मतमतांतरे होण्याचे प्रसंग आले आहेत का?
-कधीच नाही.
एखाद्या गाण्यावर दोन चाली सुचल्या तर दोन्ही पध्दतीने रेकॉ र्ड करता का?
-दुसरी चाल राखून ठवतो. पुढच्या गाण्यासाठी
गाजलेली मराठी / हिंदी गाणी पुन्हा संगीतबध्द कराविशी वाटतात का? रिमिक्स करावेसे वाटते का?
-अजिबात नाही.
तुम्ही पुणेकर आहात, मुंबईकर झाला आहात का?
-शंभर टक्के. पण ह्यापेक्षा आम्ही ‘मराठी’ आहोत याचा अभिमान आहे.
समयवस्क किंवा सिनियर संगीतकारांच्या बरोबर गाण्याबद्दल,संगीताबद्दल चर्चा करता का? कुणाशी?
-नक्की करतो. त्या त्या संगीतकारांशी नक्की करतो. संगीत, संयोजन या विषयांवर शक्य तेवढय़ा संगीतकारांशी चर्चा करतो.
एखाद्या वादकाने चालीत बदल सांगितला तर बदल करता का?
-सहसा नाही.
आत्ताच्या काळातील उत्तम गायक / गायिका कोण?
स्वप्नील बांदोडकर , वैशाली सामंत, आनंद शिंदे, बेला शेंडे
तुम्ही मेहनतीने वर आला आहात पण आज तुम्ही ऐन भरात असलेल्या लता, आशा, किशोरीताई, पं. भीमसेन जोशी, उस्ताद झाकीर हुसेन यांच्यापेक्षा अधिक मानधन घेता, काय म्हणायचयं याबद्दल?
-कोण किती मानधन घेतो हे मला माहीत नाही, पण आम्ही जे घेतो त्यामध्ये सर्व वादक, तंत्रज्ञ हे सर्व या सर्वांची आमच्यावर जबाबदारी असते व त्यांचेही मानधन त्यात समाविष्ट असते.
किती गीतकार व सिनेमाच्या दिर्ग्दशक बरोबर तुमची नाळ जुळली आहे? कोणत्या?
-गुरु ठाकुर, संजय जाधव.
लता व आशा यांमध्ये श्रेष्ठकोण?
-नो कॉमेंट.
त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे का?
त्यांच्याशी याविषयाबाबत बोललात का कधी?
-नक्कीच
उमेदवारीच्या काळात कोणी मदत केली?
-राज ठाकरे
ज्यांनी अपमान केला असेल त्यांच्याशी चांगले वागून त्यांना शरमिंदा केले आहे का? नाव सांगा.
-अनेक वेळा, अनेक जणांना
आर. डी., एस. डी., शंकर - जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, ए.आर. रहमान यांना तुमच्या आवडीप्रमाणे काय नंबर द्याल?
-आम्ही नाही देऊ शकत. आमचा नंबर शेवटचा आहे हे नक्की.
श्रीनिवास खळे, पं. ह्रदयनाथ मंगेशकर, सुधीर फडके, राम कदम,यांच्यात काय नंबर द्याल?
-आम्ही नाही देऊ शकत. आमचा नंबर शेवटचा आहे हे नक्की.
आयुष्यावर प्रभाव टाकणारी व्यक्ती कोण?
-छत्रपति शिवाजी महाराज आणि श्री गणेश
एकाच वेळा हिंदी चित्रपट व मराठी चित्रपट निर्माते आले तर पहिले काम कोणाचे कराल?
-एक काम संपवुनच दुसरे काम सुरु करायचे, त्यामुळे मराठी आधी की हिंदी आधी तसा विषयच नाही. पण आता ढोलकी तुणतुण्यातून बाहेर येऊन वेगळ काहीतरी करायची इच्छा आहे.
मराठी नाटय़संगीत व शाश्रीय संगीत याबद्दल तुमचे मत काय?
-शाश्रीय संगीत म्हणजे हा खरा संगीताचा आत्मा आहे, युनिव्हर्सिटी आहे. तर नाटय़संगीत, लोकसंगीत हे त्याचे उपप्रकार आहेत. आम्ही शिकू शकलो नाही हीच खरी आयुष्यात खंत आह. महाराष्ट्रातलं लोकसंगीत अभिजात आहे.
कुठल्या मोठय़ा भारतीय फिल्ममेकर बरोबर काम करायची इच्छा आहे.
-मणीरत्नम, संजयलीला भन्साळी, यश चोप्रा
विनोदी प्रसंगाबद्दल सांगा.
विनोदी प्रसंगाबद्दल सांगा.
असे बोलले जाते की पुण्यातले तंत्रज्ञ, गायक, संगीतकार हे हे मुंबईकरांपेक्षा अधिक मेहनती असतात.
-नो कॉमेंट
इतर प्रस्थापित संगीतकार किंवा गायकांप्रमाणे आपणही इतरांची गाणी गाऊन करीयची सुरुवात केलीत का?
-नाही; तसे करण्याची आम्हास कोणी संधी दिली नाही. आम्ही कोरसमध्ये मध्ये गायचो. तेथेही फार आनंदाने आम्हांस संधी दिली जात नसे.
एखादा गायक उपलब्ध नाही म्हणुन कधी गायक बदलणे किंवा स्वत:च ध्वनीमुद्रीत करणे असं झालय का?
-हो. अग बाई अरेच्या मधील. ‘दुर्गे दुर्गेट भारी’ लता दीदींनी गावं अशी इच्छा होती, पण त्यांच्या तारखा जुळत नव्हत्या आणि चित्रपट प्रदर्शित करण्याची वेळ जवळ आल्यामुळे मीच (अजय) गायलो.
इतर संगीतकारांकडे प्लेबॅक करताना काय वाटते?
-इतरांकडे गाताना मी (अजय) त्या संगीतकारांच गाणं माझ्या आवाजाने कसं खुलवता येईल आणि कसे यशस्वी करता येईल त्याकडे लक्ष असते.
मुंबईत आल्यानंतर करीयर घडविण्यासाठी कोणी साथ दिली?
-सुरुवातीला संगीत संयोजन करत होतो, नंतर मात्र राज ठाकरे या व्यक्तिमुळे काम मिळाले. ‘विश्वविनायक’नंतर 2 वर्षे काहीच काम नव्हते आणि नंतर राज साहेबांना ते ऐकवल्यानंतर त्यांनी साजिद नाडियादवालाकडे आमच्यासाठी शब्द टाकला.
आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल संतुष्ट आहात?
-होय. त्याने (वर बघून) आत्तापर्यंत भरभरून दिले आहे. पुढील आयुष्यात इतकं काम करायचं आहे की लोकांनी आम्हाला चांगले संगीतकार व चांगले व्यक्तिमत्व म्हणून ओळखावं.
No comments:
Post a Comment