पुण्यात नुकतीच आजचे आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांची लाईव्ह कॉन्सर्ट झाली. दि. 19 फेब्रुवारीला त्यांना राम कदम पुरस्कारही मिळतोय. या निमित्ताने अजय-अतुल यांच्याशी साधलेला हा दिलखुलास संवाद. ही मुलाखत आज रात्री (शुक्रवार) साडे-आठ ते साडे-नऊ साम टिव्हीवर दाखवण्यात गेली.
प्रश्न - आज तुम्ही इतके लोकप्रिय, यशस्वी, संगीतकार आहात. सुरूवात केली तेव्हा वाटलं होतं की आपण इथपर्यंत पोहोचू?
अतुल - ऍकच्युअली आम्हाला फक्त चांगलं संगीतकार व्हायचं होतं. पण आज जो काही प्रतिसाद आम्हाला मिळतोय ती खूप आनंदाची गोष्ट आहे. मराठी गाण्यांचा एवढा मोठा कार्यक्रम होतो ही मोठी गोष्ट आहे. आजच्या या आनंदामुळे जुन्या कटू आठवणी विसरायला होतात.

प्रश्न - संगीतकार व्हायचं आहे असं कधी वाटलं?
अजय - गीतकाराला जसे शब्द सुचतात तसे आम्हाला स्वर. स्वर ही लहानपणापासूनच आमची अभिव्यक्ती होती.
अजय - गीतकाराला जसे शब्द सुचतात तसे आम्हाला स्वर. स्वर ही लहानपणापासूनच आमची अभिव्यक्ती होती.
अतुल - कळायला लागलं तेव्हाचं गाणं आवडतं हे जाणवायला लागलं होतं. संगीताशिवाय कधीच दुसरं काही करावसं वाटलं नाही. शिक्षणामध्ये आम्ही यथातथाच होतो. उलट आज वाटतं की पहिली, दुसरी असं करत बसण्यापेक्षा जर आम्ही म्युझिकली शिकलो असतो, गाण्यातून शिकलो असतो तर आमच्या प्रगतीसाठी ते खूप छान झालं असतं
प्रश्न - काय वाटतं की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये अजूनही कलांना म्हणावं तसं महत्व नाहीये?
अतुल - खरोखरचं नाहीये. वातावरण महत्वाचं आहे. एखादा मुलगा चांगला गातोय असं समजल्यावर लगेच त्याच्यावर मेहनत घेतली गेली पाहिजे. असं झालं तर खूप मुलं निराशेपासून वाचतील. आम्ही एस.पी. कॉलेजला गेलो होतो तिथे साधारण 50 वर्षांचे गृहस्थ आले अन् आम्ही
जिना उतरत असताना जिन्यातच उभे राहिले. कळवळून आम्हाला म्हणाले मी गातो आणि माझी इच्छा आहे तुम्ही माझं गाणं ऐकावं. असे आम्हाला खूप जण भेटतात. फक्त संगीताबद्दल मी बोलत नाहीये. प्रत्येक माणसाला जे आवडतं ते करायला मिळालं तर तो खूप चांगलं काम करू शकतो. पण जर का तो करणारं काम हे त्याला न आवडणारं असेल तर तो कधीही तनमनधन अर्पून काम करु शकणार नाही.

प्रश्न- जेव्हा हा प्रवास सुरू झाला तेव्हा तो सोपा नक्कीच नव्हता. सुरूवातीला तुम्हाला डेमोचेही पैसे मिळायचे नाही, 5 गाण्यांचं काम तुम्ही फक्त 4 हजारात केलं होतं. त्या दिवसांबद्ल काय सांगाल?
अजय- या प्रश्नावर अजय एकदम खुलला. मला म्हणाला तुमचा प्रश्न मला खूप आवडला. तुम्ही जो डेमो शब्द वापरला त्याने मी 15 वर्ष मागे भूतकाळात गेलो. डेमो सोडाच पण फायनल कामाचेही कित्येकदा पैसे मिळायचे नाही. सुरूवातीला आम्ही नुसता तोंडाने डेमो द्यायचो. मग की बोर्ड घेतला. पण तेव्हाही आपण खूप काही संघर्ष करतोय असं वाटलं नाही.

प्रश्न- आम्हाला असं कळलंय की सुरेश वाडकरांच्या स्टुडिओत तुम्ही राहिला आहात. आणि अक्षरश इंडियन टॉयलेटवर प्लायवूड टाकून आंघोळ केलीय. इतक्या अडचणीतून कसा मार्ग काढला?
अतुल - सुरेश वाडकरांचा पुतण्या अवघूत वाडकर आमचा मित्र होता. त्याच्या स्टुडिओत आमचं बरंच काम चालायचं. एकदा अडचण होती म्हणून सुरेश वाडकरांच्या स्टुडिओत झोपलो. मग बऱ्याचदा तिकडे राहिलो. या लोकांच्या मदतीमुळेच मार्ग काढता आला.

प्रश्न- संगीताचं कुठलही फॉर्मल शिक्षण घेतलं नसताना तुम्ही इतकं सुंदर संगीत देता. काय रहस्य आहे?
अतुल- असं कसं सुचतं हे सांगता नाही येणार. देवाची कृपा म्हणता येईल. शब्द दिसल्या बरोबर आम्हाला चाल सुचते. आणि नुसती चालंच नाही तर संपूर्ण गाणं आम्हाला दिसतं. त्यात ढोल कसा असेल, ताशा कुठे वाजेल इतकं गाणं आमच्या समोर उभं राहतं.

अजय - मला वाटतं की संगीत हे शिकता येत नाही ते आतच असावं लागतं. तुम्ही रागदारी शिकू शकाल पण चाल कशी द्यावी हे नाही शिकवता येणार.
प्रश्न - तुम्हाला हिंदीतूनही खूप ऑफर्स येतायत. लोकसंगीताच्या बाज असलेल्या या चाली हिंदीत यशस्वी होतील असं वाटतं?
अतुल - कथेला साजेसं असं संगीत आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. 'अग बाई अरेच्च्या' मध्ये आम्ही लोकसंगीत वापरु शकलो पण 'जबरदस्त'मध्ये नाही. तेलगू सिनेमांचं संगीत आम्ही त्या संस्कृतीनुसार दिलं. तेच हिंदीतही करु.

प्रश्न- 'जोगवा'चा उल्लेख केल्याशिवाय मुलाखतीचा शेवट करता येणार नाही. जोगवासाठी हरिहरन यांचं नाव कसं सुचलं?
अजय - दुसरं नावच नव्हतं हरिहरन यांच्याशिवाय. या गाण्यासाठी तरल, दैवी भाव असलेला पातळ किंवा तलम आणि तरीही त्यात पुरुषी कणखरपणा असणारा आवाज हवा होता. त्यामुळे हे गाणं फक्त अन् फक्त हरिहरनच गाऊ शकत होते. सिनेमातला सीन हा प्रणयाचा होता. पण ते प्रेम खूप पवित्र होतं. तेव्हा आवाजातही पावित्र्य गरजेचं होतं. या सगळ्या आवश्यकता फक्त हरिहरनच पूर्ण करु शकत होते.

अतुल- हरीहरन या गाण्यासाठी मिळावेत म्हणून आम्ही इतकी वाट बघितली. तेव्हा ते लंडनमध्ये होते. लंडनमध्ये त्यावेळी ज्वालामुखीच्या राखेमुळे सर्व विमान कॅन्सल झाले होते. सांगायचा मुद्दा म्हणजे राजू पाटील आणि संजय जाधव यांना शुटिंगला गाणं पूर्ण असं मिळालंच नाही. सगळं गाणं ना ना ना ना असं धूनवर चित्रित झालं. शब्द नाही, आवाज नाही असं त्या गाण्याचं शुटिंग झालं.
ही पडद्यामागची गोष्ट आहे. जोगवाची गाणी चित्रित करणं हे खूप अवघड काम होतं संजय जाधव आणि राजू पाटील यांच्यासाठी.
ही पडद्यामागची गोष्ट आहे. जोगवाची गाणी चित्रित करणं हे खूप अवघड काम होतं संजय जाधव आणि राजू पाटील यांच्यासाठी.
प्रश्न - हळुवार शब्द आणि चाल यात अडकलेल्या मराठी संगीताला तुम्ही बाहेर काढून एक भव्यता दिली, उर्जा दिली. लोकसंगीताव्यतिरिक्त भावगीत, गझल या गीत प्रकारांवर काम करण्याचा काही विचार आहे का?
अजय - तुमचं म्हणणं बरोबर आहे. भावगीता संदर्भात आपल्याकडे मोठ मोठ्या दिग्गजांनी मोठं काम केलंय. पण कालांतराने आपण त्यात अडकून पडलो, साचलो असं मला वाटतं. प्रवाहीपणा रहावा ही सगळ्या पिढ्यांची जबाबदारी होती, पण ती त्या त्या वेळेला निभावली गेली नाही. त्यामुळे लोकसंगीत शहरी वातावरणातून मागे पडत गेलं. आमचं म्हणालं, तर मला वाटतं की प्रत्येक गाण हे भावसंगीतच आहे. 'जीव दंगला' हे भावगीतच आहे. गझलवर अजून काम करण्याची संधी मिळाली नाही पण भविष्यात नक्की काम करायला आवडेल.

- वसुंधरा काशीकर-भागवत
'अग्निपथ'च्या रिमेकसाठी करण जोहरने या दोघांना साइन केलंय.
मराठी संगीताला नवी दिशा देणाऱ्या अजय-अतुल यांच्यासाठी बॉलिवुडनेही रेड कार्पेट अंथरलंय. हिंदीत माइलस्टोन ठरलेल्या 'अग्निपथ'च्या रिमेकसाठी करण जोहरने या दोघांना साइन केलंय.
व्हरायटी ऑफ म्युझिक देणारी जोडी म्हणून आज संगीतकार अजय-अतुलचं नाव खूप वरचं आहे. मग 'विश्वविनायक'मधल्या श्लोकांची केलेली हार्मनी असो किंवा 'अगबाई अरेच्चा!'मधला गोंधळ असो किंवा दुगेर्ची आरती...गीतातल्या अर्थाचा आणि मांडणीच्या गाभ्याला कुठेही धक्का न लागू देता, अत्यंत आधुनिक पद्धतीने हे दोघेही त्या गाण्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. 'नटरंग'ची गाजलेली गाणी तर लावणीने टाकलेली कात होती. याच संगीताने या दोघांसाठी बॉलिवुडची दारं उघडली. हिंदी सिनेसृष्टीत माइलस्टोन ठरलेल्या 'अग्निपथ'च्या रिमेकचं संगीत देण्याची जबाबदारी निर्माता करण जोहरने अजय-अतुलवर सोपवली आहे. सर्वांत इण्टरेस्टिंग गोष्ट म्हणजे विजय दीनानाथ चौहान या अजरामर कॅरेक्टरसाठी हे दोघे एकदम नवी धून तयार करणार आहेत.
अजय-अतुलच्या या रेड कापेर्ट एण्ट्रीला कारणीभूत ठरला तो 'नटरंग'. या सिनेमाचं संगीत ऐकून करण जोहर आणि नव्या 'अग्निपथ'चा दिग्दर्शक करण मल्होत्रा खूप इम्प्रेस झाले आणि त्यांनी तडक या दोघांना साइन करायचं ठरवलं. 'माझ्या वडिलांचं प्रॉडक्शन असलेल्या मूळ 'अग्निपथ'ला लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं संगीत होतं. त्याच तोडीचा संगीतकार मला हवा होता. शेवटी या दोघांमुळे आमचा शोध संपला. त्यांच्या संगीताचा दर्जा उत्तम आहेच. पण ऑकेर्स्ट्रल साऊंडचाही त्यांनी खूपच सुंदर वापर केलाय', अशा शब्दांत निर्माता करणने आपल्या भावना बोलून दाखवल्याचं समजतं. आपल्या फिल्मसाठी करणने पहिल्यांदाच प्रादेशिक भाषेतल्या संगीतकारांना साइन केलंय. अभिनेता रितेश देशमुखनेच करण आणि अजय-अतुलची भेट पहिल्यांदा घालून दिली होती.
' करण जोहरने 'अग्निपथ'साठी नव्या पद्धतीने संगीत द्यायला सांगितल्यावर त्याला काय म्हणायचंय ते आम्हाला लगेच समजलं. आम्ही 'अग्निपथ' अनेकदा पाहिला, असं अतुलने सांगितलं.
ही माहिती देतानाच, या संगीताबद्दल येत्या काही दिवसांत आपण सविस्तर बोलू, असंही त्याने सांगितलं. सध्या हे दोघे या सिनेमातल्या दोन-तीन गाण्यांवर काम करत आहेत.
करण जोहर करत असलेल्या अग्निपथचा रिमेक सुरुवातीपासूनच चचेर्त आहे. अमिताभ बच्चन यांनी गाजवलेला अग्निपथ लोकांच्या अजूनही लक्षात असला, तरी त्याची गाणी मात्र एखादा अपवाद वगळता फारशी गाजली नाहीत. त्यामुळे याचा रिमेक बनवताना, अजय-अतुलवर मोठी
जबाबदारी असणार आहे. करण जोहरच्या या ऑफरमुळे बॉलिवुडमध्ये आणखी दोन मराठी चेहरे दिमाखात सामील होतील.
No comments:
Post a Comment