Tuesday, 10 September 2013

संगीत हीच अभिव्यक्ती- अजय-अतुल (सकाळ वृत्तसेवा)


 पुण्यात नुकतीच आजचे आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांची लाईव्ह कॉन्सर्ट झाली. दि. 19 फेब्रुवारीला त्यांना राम कदम पुरस्कारही मिळतोय. या निमित्ताने अजय-अतुल यांच्याशी साधलेला हा दिलखुलास संवाद. ही मुलाखत आज रात्री (शुक्रवार) साडे-आठ ते साडे-नऊ साम टिव्हीवर दाखवण्यात गेली.
 
प्रश्‍न - आज तुम्ही इतके लोकप्रिय, यशस्वी, संगीतकार आहात. सुरूवात केली तेव्हा वाटलं होतं की आपण इथपर्यंत पोहोचू?
अतुल - ऍकच्युअली आम्हाला फक्त चांगलं संगीतकार व्हायचं होतं. पण आज जो काही प्रतिसाद आम्हाला मिळतोय ती खूप आनंदाची गोष्ट आहे. मराठी गाण्यांचा एवढा मोठा कार्यक्रम होतो ही मोठी गोष्ट आहे. आजच्या या आनंदामुळे जुन्या कटू आठवणी विसरायला होतात.
 
प्रश्‍न - संगीतकार व्हायचं आहे असं कधी वाटलं?
अजय - गीतकाराला जसे शब्द सुचतात तसे आम्हाला स्वर. स्वर ही लहानपणापासूनच आमची अभिव्यक्ती होती.
अतुल - कळायला लागलं तेव्हाचं गाणं आवडतं हे जाणवायला लागलं होतं. संगीताशिवाय कधीच दुसरं काही करावसं वाटलं नाही. शिक्षणामध्ये आम्ही यथातथाच होतो. उलट आज वाटतं की पहिली, दुसरी असं करत बसण्यापेक्षा जर आम्ही म्युझिकली शिकलो असतो, गाण्यातून शिकलो असतो तर आमच्या प्रगतीसाठी ते खूप छान झालं असतं
 
प्रश्‍न - काय वाटतं की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये अजूनही कलांना म्हणावं तसं महत्व नाहीये?
अतुल - खरोखरचं नाहीये. वातावरण महत्वाचं आहे. एखादा मुलगा चांगला गातोय असं समजल्यावर लगेच त्याच्यावर मेहनत घेतली गेली पाहिजे. असं झालं तर खूप मुलं निराशेपासून वाचतील. आम्ही एस.पी. कॉलेजला गेलो होतो तिथे साधारण 50 वर्षांचे गृहस्थ आले अन्‌ आम्ही
जिना उतरत असताना जिन्यातच उभे राहिले. कळवळून आम्हाला म्हणाले मी गातो आणि माझी इच्छा आहे तुम्ही माझं गाणं ऐकावं. असे आम्हाला खूप जण भेटतात. फक्त संगीताबद्दल मी बोलत नाहीये. प्रत्येक माणसाला जे आवडतं ते करायला मिळालं तर तो खूप चांगलं काम करू शकतो. पण जर का तो करणारं काम हे त्याला न आवडणारं असेल तर तो कधीही तनमनधन अर्पून काम करु शकणार नाही.
 
प्रश्‍न- जेव्हा हा प्रवास सुरू झाला तेव्हा तो सोपा नक्कीच नव्हता. सुरूवातीला तुम्हाला डेमोचेही पैसे मिळायचे नाही, 5 गाण्यांचं काम तुम्ही फक्त 4 हजारात केलं होतं. त्या दिवसांबद्‌ल काय सांगाल?
अजय- या प्रश्‍नावर अजय एकदम खुलला. मला म्हणाला तुमचा प्रश्‍न मला खूप आवडला. तुम्ही जो डेमो शब्द वापरला त्याने मी 15 वर्ष मागे भूतकाळात गेलो. डेमो सोडाच पण फायनल कामाचेही कित्येकदा पैसे मिळायचे नाही. सुरूवातीला आम्ही नुसता तोंडाने डेमो द्यायचो. मग की बोर्ड घेतला. पण तेव्हाही आपण खूप काही संघर्ष करतोय असं वाटलं नाही.
 
प्रश्‍न- आम्हाला असं कळलंय की सुरेश वाडकरांच्या स्टुडिओत तुम्ही राहिला आहात. आणि अक्षरश इंडियन टॉयलेटवर प्लायवूड टाकून आंघोळ केलीय. इतक्‍या अडचणीतून कसा मार्ग काढला?
अतुल - सुरेश वाडकरांचा पुतण्या अवघूत वाडकर आमचा मित्र होता. त्याच्या स्टुडिओत आमचं बरंच काम चालायचं. एकदा अडचण होती म्हणून सुरेश वाडकरांच्या स्टुडिओत झोपलो. मग बऱ्याचदा तिकडे राहिलो. या लोकांच्या मदतीमुळेच मार्ग काढता आला.
 
प्रश्‍न- संगीताचं कुठलही फॉर्मल शिक्षण घेतलं नसताना तुम्ही इतकं सुंदर संगीत देता. काय रहस्य आहे?
अतुल- असं कसं सुचतं हे सांगता नाही येणार. देवाची कृपा म्हणता येईल. शब्द दिसल्या बरोबर आम्हाला चाल सुचते. आणि नुसती चालंच नाही तर संपूर्ण गाणं आम्हाला दिसतं. त्यात ढोल कसा असेल, ताशा कुठे वाजेल इतकं गाणं आमच्या समोर उभं राहतं.
अजय - मला वाटतं की संगीत हे शिकता येत नाही ते आतच असावं लागतं. तुम्ही रागदारी शिकू शकाल पण चाल कशी द्यावी हे नाही शिकवता येणार.
 
प्रश्‍न - तुम्हाला हिंदीतूनही खूप ऑफर्स येतायत. लोकसंगीताच्या बाज असलेल्या या चाली हिंदीत यशस्वी होतील असं वाटतं?
अतुल - कथेला साजेसं असं संगीत आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. 'अग बाई अरेच्च्या' मध्ये आम्ही लोकसंगीत वापरु शकलो पण 'जबरदस्त'मध्ये नाही. तेलगू सिनेमांचं संगीत आम्ही त्या संस्कृतीनुसार दिलं. तेच हिंदीतही करु.
 
प्रश्‍न- 'जोगवा'चा उल्लेख केल्याशिवाय मुलाखतीचा शेवट करता येणार नाही. जोगवासाठी हरिहरन यांचं नाव कसं सुचलं?
अजय - दुसरं नावच नव्हतं हरिहरन यांच्याशिवाय. या गाण्यासाठी तरल, दैवी भाव असलेला पातळ किंवा तलम आणि तरीही त्यात पुरुषी कणखरपणा असणारा आवाज हवा होता. त्यामुळे हे गाणं फक्त अन्‌ फक्त हरिहरनच गाऊ शकत होते. सिनेमातला सीन हा प्रणयाचा होता. पण ते प्रेम खूप पवित्र होतं. तेव्हा आवाजातही पावित्र्य गरजेचं होतं. या सगळ्या आवश्‍यकता फक्त हरिहरनच पूर्ण करु शकत होते.
अतुल- हरीहरन या गाण्यासाठी मिळावेत म्हणून आम्ही इतकी वाट बघितली. तेव्हा ते लंडनमध्ये होते. लंडनमध्ये त्यावेळी ज्वालामुखीच्या राखेमुळे सर्व विमान कॅन्सल झाले होते. सांगायचा मुद्दा म्हणजे राजू पाटील आणि संजय जाधव यांना शुटिंगला गाणं पूर्ण असं मिळालंच नाही. सगळं गाणं ना ना ना ना असं धूनवर चित्रित झालं. शब्द नाही, आवाज नाही असं त्या गाण्याचं शुटिंग झालं.
ही पडद्यामागची गोष्ट आहे. जोगवाची गाणी चित्रित करणं हे खूप अवघड काम होतं संजय जाधव आणि राजू पाटील यांच्यासाठी.
 
प्रश्‍न - हळुवार शब्द आणि चाल यात अडकलेल्या मराठी संगीताला तुम्ही बाहेर काढून एक भव्यता दिली, उर्जा दिली. लोकसंगीताव्यतिरिक्त भावगीत, गझल या गीत प्रकारांवर काम करण्याचा काही विचार आहे का?
अजय - तुमचं म्हणणं बरोबर आहे. भावगीता संदर्भात आपल्याकडे मोठ मोठ्या दिग्गजांनी मोठं काम केलंय. पण कालांतराने आपण त्यात अडकून पडलो, साचलो असं मला वाटतं. प्रवाहीपणा रहावा ही सगळ्या पिढ्यांची जबाबदारी होती, पण ती त्या त्या वेळेला निभावली गेली नाही. त्यामुळे लोकसंगीत शहरी वातावरणातून मागे पडत गेलं. आमचं म्हणालं, तर मला वाटतं की प्रत्येक गाण हे भावसंगीतच आहे. 'जीव दंगला' हे भावगीतच आहे. गझलवर अजून काम करण्याची संधी मिळाली नाही पण भविष्यात नक्की काम करायला आवडेल.
- वसुंधरा काशीकर-भागवत

'अग्निपथ'च्या रिमेकसाठी करण जोहरने या दोघांना साइन केलंय.
                       मराठी संगीताला नवी दिशा देणाऱ्या अजय-अतुल यांच्यासाठी बॉलिवुडनेही रेड कार्पेट अंथरलंय. हिंदीत माइलस्टोन ठरलेल्या 'अग्निपथ'च्या रिमेकसाठी करण जोहरने या दोघांना साइन केलंय.
                        व्हरायटी ऑफ म्युझिक देणारी जोडी म्हणून आज संगीतकार अजय-अतुलचं नाव खूप वरचं आहे. मग 'विश्वविनायक'मधल्या श्लोकांची केलेली हार्मनी असो किंवा 'अगबाई अरेच्चा!'मधला गोंधळ असो किंवा दुगेर्ची आरती...गीतातल्या अर्थाचा आणि मांडणीच्या गाभ्याला कुठेही धक्का न लागू देता, अत्यंत आधुनिक पद्धतीने हे दोघेही त्या गाण्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. 'नटरंग'ची गाजलेली गाणी तर लावणीने टाकलेली कात होती. याच संगीताने या दोघांसाठी बॉलिवुडची दारं उघडली. हिंदी सिनेसृष्टीत माइलस्टोन ठरलेल्या 'अग्निपथ'च्या रिमेकचं संगीत देण्याची जबाबदारी निर्माता करण जोहरने अजय-अतुलवर सोपवली आहे. सर्वांत इण्टरेस्टिंग गोष्ट म्हणजे विजय दीनानाथ चौहान या अजरामर कॅरेक्टरसाठी हे दोघे एकदम नवी धून तयार करणार आहेत.
                        अजय-अतुलच्या या रेड कापेर्ट एण्ट्रीला कारणीभूत ठरला तो 'नटरंग'. या सिनेमाचं संगीत ऐकून करण जोहर आणि नव्या 'अग्निपथ'चा दिग्दर्शक करण मल्होत्रा खूप इम्प्रेस झाले आणि त्यांनी तडक या दोघांना साइन करायचं ठरवलं. 'माझ्या वडिलांचं प्रॉडक्शन असलेल्या मूळ 'अग्निपथ'ला लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं संगीत होतं. त्याच तोडीचा संगीतकार मला हवा होता. शेवटी या दोघांमुळे आमचा शोध संपला. त्यांच्या संगीताचा दर्जा उत्तम आहेच. पण ऑकेर्स्ट्रल साऊंडचाही त्यांनी खूपच सुंदर वापर केलाय', अशा शब्दांत निर्माता करणने आपल्या भावना बोलून दाखवल्याचं समजतं. आपल्या फिल्मसाठी करणने पहिल्यांदाच प्रादेशिक भाषेतल्या संगीतकारांना साइन केलंय. अभिनेता रितेश देशमुखनेच करण आणि अजय-अतुलची भेट पहिल्यांदा घालून दिली होती.
                      ' करण जोहरने 'अग्निपथ'साठी नव्या पद्धतीने संगीत द्यायला सांगितल्यावर त्याला काय म्हणायचंय ते आम्हाला लगेच समजलं. आम्ही 'अग्निपथ' अनेकदा पाहिला, असं अतुलने सांगितलं.
ही माहिती देतानाच, या संगीताबद्दल येत्या काही दिवसांत आपण सविस्तर बोलू, असंही त्याने सांगितलं. सध्या हे दोघे या सिनेमातल्या दोन-तीन गाण्यांवर काम करत आहेत.
                          करण जोहर करत असलेल्या अग्निपथचा रिमेक सुरुवातीपासूनच चचेर्त आहे. अमिताभ बच्चन यांनी गाजवलेला अग्निपथ लोकांच्या अजूनही लक्षात असला, तरी त्याची गाणी मात्र एखादा अपवाद वगळता फारशी गाजली नाहीत. त्यामुळे याचा रिमेक बनवताना, अजय-अतुलवर मोठी
जबाबदारी असणार आहे. करण जोहरच्या या ऑफरमुळे बॉलिवुडमध्ये आणखी दोन मराठी चेहरे दिमाखात सामील होतील.
 

अजय-अतुलच्या चाहत्यांना खुशखबर!

मुंबई - अजय-अतुल यांच्या संगीतात एक वेगळा गोडवा आहे. "विरुद्ध' या चित्रपटाच्या वेळी मला त्याची प्रचिती आली होती. त्या वेळीच त्यांच्यातील गुणवत्ता दिसली होती. आता ती राष्ट्रीय पुरस्कारामुळे सिद्ध झाली आहे. मला त्याचा आनंद वाटतो, असे उद्‌गार काढून अमिताभ बच्चन यांनी संगीतकार अजय-अतुल यांचे तोंडभरून कौतुक केले.
मराठी अस्मितेचा झेंडा सध्या सगळीकडे फडकत असताना आता आणखी एक मराठी पाऊल पुढे पडले आहे. संगीतकार अजय-अतुल यांनी आपल्या चाहत्यांसाठी "अजयअतुल डॉट कॉम' नावाची वेबसाईट सुरू केली आहे. वेबसाईटचे उद्‌घाटन प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते झाले. त्या वेळी श्री. बच्चन यांनी अजय-अतुल यांची खूप स्तुती केली. "जोगवा' या चित्रपटासाठी त्यांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल तसेच त्यांच्या सध्या गाजत असलेल्या "नटरंग' या चित्रपटातील गाण्यांबद्दल श्री. बच्चन यांनी स्तुतिसुमने उधळली. ते म्हणाले, की या संगीतकार जोडीकडे असलेली गुणवत्ता आणि कौशल्य आपल्याला आधीच कळले होते. त्यांचे एकूणच गुण व नम्रता पाहून आपण या समारंभाला आलो आहोत. सध्या प्रादेशिक भाषांतील चित्रपटांना खूप महत्त्व आले आहे. त्यामुळे आमची कंपनी प्रादेशिक भाषेतील चित्रपटांची निर्मिती अधिक करणार आहे, अशी माहिती अमिताभ यांनी दिली. सांताक्रूझ येथे एका पंचतारांकित हॉटेलात हा सोहळा रंगला होता. ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल यांच्यासहित हिंदीमधील काही मान्यवर मंडळी उपस्थित होती. मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक तसेच कलाकार अजय-अतुल यांचे कौतुक करायला आले होते. त्यात अभिनेते सचिन पिळगांवकर, दिग्दर्शक राजीव पाटील, अभिनेता उपेंद्र लिमये, अभिनेत्री मुक्ता बर्वे, अमृता खानविलकर, श्रीरंग गोडबोले, गुरू ठाकूर, संजय जाधव यांचा सहभाग होता.
 

आम्ही लोककलावंत - अजय-अतुल


                   गवळण, लावणी या अस्सल मराठी लोककलांसाठी मराठी मुलांना स्ट्रगल करावे लागत असेल तर त्यांच्या मराठीपणाचा काही उपयोग नाही, असे मत प्रसिद्ध गायक अजय - अतुल यांनी व्यक्त केले. आम्ही संगीतकार होण्याआधी लोककलावंत असल्याने, संगीतातील बिजे आम्हाला या मातीतून मिळाली ती शिकण्यासाठी जर आजच्या मुलांना पाटी, दप्तर घेऊन क्लासला जाण्याची गरज वाटत असेल तर, मराठी संगीताच्या वाटचालीबाबत प्रश्न चिन्ह निर्माण होईल असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
                   शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा राम कदम कलागौरव पुरस्कार अजय - अतुल यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आला. शाल, श्रीफळ, ५१ हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमास माजी खासदार श्रीनिवास पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, ज्येष्ठ संगीत संयोजक इनॉक डॅनियल, श्री संत दर्शन मंडळाचे श्रीराम साठे उपस्थित होते
                     मनापासून केलेली कोणतीही गोष्ट दुसऱ्याच्या मनाला जाऊन भिडते हेच आमच्या यशाचे गुपित आहे. असे सांगून, कुणाला इम्प्रेस करण्यासाठी संगीत केले नाही तर, मनाला जे भावेल ते करत गेलो. असे सांगून, म्युझिकल शॉपमध्ये रॉक, पॉप या गाण्यांबरोबर मराठी चित्रपट गीतांसाठी नविन रॅक उघडण्याचे स्वप्न असल्याचे अतुलने सांगितले. मराठी संगीताला गत वैभव मिळवून देणारी ही जोडी मराठी बरोबरच इतर ही भाषांमध्ये चांगले काम करीत आहे. हा मराठी मातीचा सन्मान आहे, असे पवार म्हणाले.

अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेला नविन लेटेस्ट अग्निपथ...

अजय अतुलच संगीत,ह्रितिक रोशनचा लुक ,संजय दत्तच टक्कल व कानातील बाळी या तीन गोष्टीमुळे मला अग्निपथच आकर्षण आहे.
 इथे फक्त अग्निपथ च्या संगीताबद्दल लिहिणार आहे.मला संगीतातला एकही राग काळत नाही,जे कानाला चांगल वाटत ते मी ऐकतो त्यामुळे खाली मी जे काही लिहिलय ते माझ वयक्तिक मत आहे इतर कुणीही राग मानण्याच कारण नही अन मानाला तरी माझी हरकत नाही.असो सुरवात चिकनी चमेली पासून मुन्नी,शिला,जलेबी बाई अन आता चिकनी चमेली ह्या लई भारी आयटम आहेत.खारूक मला आवडत नही त्यामुळे त्याच्या छम्मक छल्लोचा इथे उल्लेख नाही, असो विषय तो नाही.
 जी मजा गावरान कोंबडी ला असते ती मजा बॉयलर चिकनला नही हे खाण्यासोबत इथेही लागू होत.श्रेया घोषाल ही १०१% उत्कृष्ट गायिका आहे यात वाद नही.पण कोल्हापुरी झणझणीत गावरान चिकन सोबत जर तुम्हाला कुणी देशपांड्यांच्या घरची साजूक तूप लावलेली पुरणाची पोळी दिली तर तुम्हाला काय वाटेल तस्सच मला हे गाण पहिल्यांदा ऐकल्यावर वाटल होत.
 साजूक तूप लावलेली पुरणपोळी व झणझणीत गावरान चिकन या ऐकत्र खायच्या गोष्टी नव्हेत त्या स्वतंत्र खाल्ल्या तरच तृप्ती होते.या गाण्यात हाच घोळ झालाय.
 एवढा जबरदस्त महाराष्ट्रीयन ओर्केष्ट्रा असताना त्यात विनाकारण बंगाली रसगुल्ला मिक्स केला आहे त्यामुळे चांगल्या गाण्याच वाट्टोळ झाल आहे.विश्वास बसत नसेल तर "जानलेवा जलवा है देखणे मे हलवा है" हे श्रेया च्या तोंडून ऐका.हे गाण ऐकल्यावर येथे पाहिजे जातीचे ह्या संत वचनाचा प्रत्येय येतो.
 थोडक्यात सांगायचं म्हणजे हे गाण चांगल झाल असत जर इथे श्रेया च्या जागी सुनिधी चोहान असती तर.खर तर हे गण ऐकण्यापेक्षा यावर गणपती मिरवणुकीत नाचायचं असत.असो.

ओ सय्या
 या चित्रपटातील नितात सुंदर गाण म्हणजे ओ सय्या हे होय .हे गाण पहिल्यांदा ऐकल तेंव्हाच खूप आवडल.रूपकुमार राठोड यांचा आवाज ,गाण्याला असणारा सुफी टच,आणि अजय अतुल याचं कम्पोझिशन हे सगळ उत्तम जुळून आलय .अजय अतुल हे कुठल्याही लाउड वाद्याशिवाय चांगल गाण देऊ शकतात हे त्यांनी आधीच जोगवातील जीव रंगला या गाण्यातून दाखवून दिल आहेच.ते त्यांनी इथे पुन्हा सिद्ध केलं

गुन गुना रे

अजून एक माझ आवडत गाण.एकदम foot tapping song.या ठिकाणी अजय अतुल यांनी एकदम योग्य निर्णय घेऊन सुनिधी चोहान ला गायिका म्हणून घेतलं अन ते योग्य आहे हे तिने ते पहिल्याच कडव्यात प्रूव्ह करून दाखवलं.ढोल ताशा ,महाराष्ट्रीयन लोकसंगीत हा अजय अतुल चा प्लस पोईंट.याच गाण्यात त्यांनी "गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजेची लाली " या त्यांच्या जुन्या मराठी गीतात वापरलेल एक वाद्य पुन्हा इथे चांगल वापरलं आहे.हे गाण आवडण्याच अजून कारण म्हणजे शेवटी शेवटी का होईना उदित नारायण यांचा आवाज.सुनिधी चोहान हिचा जादुई मोहक आवाज ऐकल्यावर उदित नारायण याचं कडव म्हणजे जेवणानंतरच डेझर्ट आहे.कदाचित खाने के बाद कुछ मिठा हो जाये म्हणून उदित नारायण यांचा आवाज घ्यायचा मोह अजय अतुल यांना सुद्धा आवरला नसेल.

शाह का रुतबा
 ही कव्वाली बरी आहे पण का कुणास ठाऊक हे गाण पहिल्यांदा ऐकल व लगेच माझ्या सगळ्यात आवडत्या संगीतकाराच(रेहमानच) मांगल पांडे या चित्रपटातील अल मुदथ मौला हे गाण आठवल अन शाह का रुतबा ह्या गाण्यावरच माझा इंटरेस्ट संपला व मी पुन्हा अल मुदथ मौला हे ऐकू लागलो.शाह का रुतबा मधील सुखविंदर व आनंद राज आनंद यांचा आवाज उत्तम.

देवा श्री गणेशा
 हे गाण स्वत: अतुल ने गायलंय अन चांगल गायलंय.या पेक्षा आपल् मराठीतील मोरया हे गाण कैकपटीने आवडत मला.पण हे सुद्धा ठीक आहे.मोरया मध्ये ढोलचा पक्का पुणेरी फील होता अन या मध्ये मुंबईचा जाणवतो अन ते अतुल ने सुद्धा मान्य केल आहे अन जो कथेनुसार योग्य आहे अस वाटत .मोरया गाण्यातून ज्या भावना पोहोचतात त्य या गाण्यातून पोहचत नाही अस वाटत पण यात अजय अतुल चा नक्कीच काही दोष नसावा कारण कथेची मागणी .असो.

अजय-अतुल यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा....


मुळ गाव?
-
जन्म पुणे येथे झाला. अतुल थोरला भाऊ आणि मी (अजय) दोन वर्षांनी लहान. आम्ही दोनच भाऊ(सख्खे)

आई वडिलांची पार्श्वभूमी
-
आई वडील अत्यंत गरीब परिस्थितीत होते. आमचीही तशीच होती. वडीलांना चार भाऊ तीन बहिणी. शिक्षणाचा फार ओढा घरात नव्हता. पण सर्वांमध्ये वडीलच शिकले.ग्रज्युएट झाले (शिक्षणाची जाण असल्यामुळे). नंतर सरकारी नोकरी स्वीकारली. वडिलांच्या लहानपणी ते आपल्या भावंडांबरोबर चुलत भावंडांबरोबर लिंबू,मिरची, कोथिंबीर अशा वस्तू विकून घर चालविण्यास हातभार लावत असत. वडिलांचा एक भाऊ(थोरला) शाळेत जाऊन आला की मग वडील त्याचा शर्ट घालून शाळेत जायचे. अशी त्यांची मूळ परिस्थिती. आईच्या माहेरीपण प्रचंड गरीबी.आजोळी शेती हाच व्यवसाय असला तरी त्यात फार उत्पन्न होत नसे. आमचे मामा, आले पाकाच्या वडय़ा विकून घर चालवीत असत.

शालेय शिक्षण कुठपर्यंत झालायं?
-
अतुलने वकिली म्हणजेच लॉ चे शिक्षण अर्धवट सोडले. तर मी बॉ. कॉम. चे शिक्षण अर्धवट सोडले. आयुष्यात संगीतात करीयर करायचे निश्चित असल्यामुळे. सांगितिक क्षेत्रात संधी मिळत गेल्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. संधी मिळाल्यानंतर काम स्विकारत गेलो, त्यातून थोडेफार पैसे मिळत असे (त्याची गरजही होती).

संगीत या क्षेत्राशी कधी संबंध आला?
-
संगीत क्षेत्राची सुरुवात मी (अजय) कोरसमध्ये गाऊन केली आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे. दुसरीत तिसरीत असताना शाळेतल्या कवितांना चाली लावत होतो, पण चाल लावणे म्हणजेच संगीत देणं/संगीतकार होणे हे आम्हाला माहित नव्हते.

संगीत दिग्दर्शन करायचे कधी ठरवले?
-
संगीतच करायचं हे लहानपणीच पक्के ठरविले होते.

आई वडिलांची प्रतिक्रिया काय होती?
-
आई वडीलांचा संगीत व्यवसायासाठी पुर्ण पाठिंबा होता,परंतु आपल्याकडे घरात एक पद्धत असते ज्यानुसार मुलांची वयं 17 ते 20 वर्षे असताना ते नोकरी करत नाहीत, हे मात्र आम्हाला ऐकावे लागत असे, पण कालांतराने ते कमी झाले. कामं मिळत गेल्याने त्यांचाही आत्मविश्वास वाढत गेला आणि त्यानंतर आजतागायत आम्हाला भरपूर पाठिंबा दिला. संगीत देणं हे काम मनापासून करा आणि केवळ पैसे मिळणार म्हणून वाट्टेल ते काम स्वीकारू नका; असा सल्ला वडीलांनी दिला.

लहानपणाच्या आठवणी
-
शाळेत असताना खूप कवितांना चाली दिल्या. साने गुरुजींचीदेह मंदिर चित्र मंदिर एक तेथे प्रार्थना’, ‘टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले’, ‘या बाळांनो या रे या’. एक महत्त्वाची आठवण म्हणजे आम्ही शिरुरला असताना आमच्याकडे एक टेप रेकॉर्डर आणला आणि एकच कॅसेट आणली, बाबासाहेब देशमुखांचा पोवाडा. तो अतुलला पाठ झाला आणि मग शिरुरमध्ये कोणत्याही कार्यक्रमाला त्याला तो सादर करण्यास बोलवत असे, त्याला सर्वबाल शाहीरम्हणू लागले. त्यामुळे शाळेत प्रार्थनेपासून ते कोणत्याही सांस्कृति कार्यक्रमांपर्यंत अगदी गॅदरींगसुध्दा सर्वच गोष्टींमध्ये आम्ही असायचो.महत्त्वाची आठवण म्हणजे शिरुरच्या विद्याधाम प्रशाला शाळेतून आम्ही जेव्हा राजगुरुनगरला महात्मा गांधी विद्यालय शाळेत गेलो तेव्हा त्या शिरुरच्या शाळेतील मुख्याध्यापकांनी राजगुरुनगरच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहिले की ‘‘आम्ही दोन हिरे तुमच्याकडे सुपुर्द करीत आहोत, त्यांचा योग्य सांभाळ करा, जोपासना करा’’ ही आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट होती.

आपल्या मते अमिताभ मोठा की आर. डी. बर्मन?
-
नो कॉमेंट

आवडते संगीतकार कोणते?
-
तसे सगळेच, पण लहानपणी बप्पी लहरी. नंतर लक्ष्मीकांत प्यारेलाल आवडायला लागले. आता मोठे झाल्यानंतर कळले मदन मोहन, खळे,बाबूजी, राम कदम, विश्वनाथ मोरे, वसंत देसाई, वसंत पवार, श्रीधर फडके असे अनेक. पाश्चिमात्य ऐकायला लागल्यानंतर मोझार्ट, विवाल्डी,सॅम्युएल बार्बर, जेरी गोल्डस्मिथ, हल झिमर आणि जॉन विलीयम्स् खूप ऐकले. हिंदुस्थानी म्हणायचे तर आर.डी. आणि ईलाई राजांचा प्रचंड प्रभाव आमच्यावर आहे. .आर. रहमानला आम्ही मानतो.

कोणात्या संगीतकाराचा आपल्यावर सर्वात जास्त प्रभाव आहे?
-
जॉन विलीयम्स

संगीत दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट कोणता?
-
गायब (हिन्दी)

तुम्ही दिलेली हीट गाणी इतरांच्या आवाजात ऐकल्यावर ती आपण गायला पाहिजे होती, असे वाटते का?
-
आजिबात नाही

हिंदी चित्रपट संगीत मराठी चित्रपट संगीत यात अधिक आव्हानात्मक काय वाटते?
-
संगीतात आव्हानात्मक नसतं, चित्रपटातली परिस्थिती कशी आहे आणि त्यानुसार संगीत द्यायचय हे आव्हान असतं.

आयुष्यात आलेले अपमानाचे, आनंदाचे तसेच रागाचे दोन तीन प्रसंग सांगा!
-
अपमान अनेकवेळा झाला. वाद्यांना हात लावू देणं वगेरे. वाद्यांबद्दल आदर असूनसुध्दा असे अपमान अनेकवेळा झाले. आनंदाची गोष्ट एवढीच होती की आमच्या दोन्ही आज्यांच्या समोर बँड पथके होती त्यामुळे तिथे जाऊन ट्रम्पेट हातात घेणे, बेस ड्रम/ढोल वाजवायला मिळत असे.

एकमेकांपासून वेगळे होऊन काम करु शकाल का?
-
प्रश्नच येत नाही. कामच काय पण काहीच करु शकत नाही.

एकमेकांचे प्लस माईनस पॉईंट सांगा.
-
अतुलचा प्लस प्वाईंट म्हणजे तो आग्रही आहे. आम्हाला जे पाहिजे ते तो कलाकारांकडून करवून घेतो. मी (अजय) संकोच करतो पण तो नाही. हा माझा माईनस प्वाईंट. अतुलचा माईनस प्वाईंट म्हणजे तो खुप लवकर रागावतो आणि मी फार रागवत नाही.

किती गाणी हीट झाली?
-
रसिकांनी ठरवायचे.

गाडीत असताना मोबाईल बंद असेल तर कोणात्या संगीतकारांची/गायकांची गाणी ऐकता?
-
आर. डी. आणि ईलाई राजा

आपापसात वादविवाद, भांडणे मतमतांतरे होण्याचे प्रसंग आले आहेत का?
-
कधीच नाही.

एखाद्या गाण्यावर दोन चाली सुचल्या तर दोन्ही पध्दतीने रेकॉ र्ड करता का?
-
दुसरी चाल राखून ठवतो. पुढच्या गाण्यासाठी

गाजलेली मराठी / हिंदी गाणी पुन्हा संगीतबध्द कराविशी वाटतात का? रिमिक्स करावेसे वाटते का?
-
अजिबात नाही.

तुम्ही पुणेकर आहात, मुंबईकर झाला आहात का?
-
शंभर टक्के. पण ह्यापेक्षा आम्हीमराठीआहोत याचा अभिमान आहे.

समयवस्क किंवा सिनियर संगीतकारांच्या बरोबर गाण्याबद्दल,संगीताबद्दल चर्चा करता का? कुणाशी?
-
नक्की करतो. त्या त्या संगीतकारांशी नक्की करतो. संगीत, संयोजन या विषयांवर शक्य तेवढय़ा संगीतकारांशी चर्चा करतो.

एखाद्या वादकाने चालीत बदल सांगितला तर बदल करता का?
-
सहसा नाही.

आत्ताच्या काळातील उत्तम गायक / गायिका कोण?
स्वप्नील बांदोडकर , वैशाली सामंत, आनंद शिंदे, बेला शेंडे

तुम्ही मेहनतीने वर आला आहात पण आज तुम्ही ऐन भरात असलेल्या लता, आशा, किशोरीताई, पं. भीमसेन जोशी, उस्ताद झाकीर हुसेन यांच्यापेक्षा अधिक मानधन घेता, काय म्हणायचयं याबद्दल?
-
कोण किती मानधन घेतो हे मला माहीत नाही, पण आम्ही जे घेतो त्यामध्ये सर्व वादक, तंत्रज्ञ हे सर्व या सर्वांची आमच्यावर जबाबदारी असते त्यांचेही मानधन त्यात समाविष्ट असते.

किती गीतकार सिनेमाच्या दिर्ग्दशक बरोबर तुमची नाळ जुळली आहे? कोणत्या?
-
गुरु ठाकुर, संजय जाधव.

लता आशा यांमध्ये श्रेष्ठकोण?
-
नो कॉमेंट.

त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे का?
त्यांच्याशी याविषयाबाबत बोललात का कधी?
-
नक्कीच

उमेदवारीच्या काळात कोणी मदत केली?
-
राज ठाकरे

ज्यांनी अपमान केला असेल त्यांच्याशी चांगले वागून त्यांना शरमिंदा केले आहे का? नाव सांगा.
-
अनेक वेळा, अनेक जणांना

आर. डी., एस. डी., शंकर - जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, .आर. रहमान यांना तुमच्या आवडीप्रमाणे काय नंबर द्याल?
-
आम्ही नाही देऊ शकत. आमचा नंबर शेवटचा आहे हे नक्की.

श्रीनिवास खळे, पं. ह्रदयनाथ मंगेशकर, सुधीर फडके, राम कदम,यांच्यात काय नंबर द्याल?
-
आम्ही नाही देऊ शकत. आमचा नंबर शेवटचा आहे हे नक्की.

आयुष्यावर प्रभाव टाकणारी व्यक्ती कोण?
-
छत्रपति शिवाजी महाराज आणि श्री गणेश

एकाच वेळा हिंदी चित्रपट मराठी चित्रपट निर्माते आले तर पहिले काम कोणाचे कराल?
-
एक काम संपवुनच दुसरे काम सुरु करायचे, त्यामुळे मराठी आधी की हिंदी आधी तसा विषयच नाही. पण आता ढोलकी तुणतुण्यातून बाहेर येऊन वेगळ काहीतरी करायची इच्छा आहे.

मराठी नाटय़संगीत शाश्रीय संगीत याबद्दल तुमचे मत काय?
-
शाश्रीय संगीत म्हणजे हा खरा संगीताचा आत्मा आहे, युनिव्हर्सिटी आहे. तर नाटय़संगीत, लोकसंगीत हे त्याचे उपप्रकार आहेत. आम्ही शिकू शकलो नाही हीच खरी आयुष्यात खंत आह. महाराष्ट्रातलं लोकसंगीत अभिजात आहे.

कुठल्या मोठय़ा भारतीय फिल्ममेकर बरोबर काम करायची इच्छा आहे.
-
मणीरत्नम, संजयलीला भन्साळी, यश चोप्रा

विनोदी प्रसंगाबद्दल सांगा.
विनोदी प्रसंगाबद्दल सांगा.

असे बोलले जाते की पुण्यातले तंत्रज्ञ, गायक, संगीतकार हे हे मुंबईकरांपेक्षा अधिक मेहनती असतात.
-
नो कॉमेंट

इतर प्रस्थापित संगीतकार किंवा गायकांप्रमाणे आपणही इतरांची गाणी गाऊन करीयची सुरुवात केलीत का?
-
नाही; तसे करण्याची आम्हास कोणी संधी दिली नाही. आम्ही कोरसमध्ये मध्ये गायचो. तेथेही फार आनंदाने आम्हांस संधी दिली जात नसे.

एखादा गायक उपलब्ध नाही म्हणुन कधी गायक बदलणे किंवा स्वत: ध्वनीमुद्रीत करणे असं झालय का?
-
हो. अग बाई अरेच्या मधील. ‘दुर्गे दुर्गेट भारीलता दीदींनी गावं अशी इच्छा होती, पण त्यांच्या तारखा जुळत नव्हत्या आणि चित्रपट प्रदर्शित करण्याची वेळ जवळ आल्यामुळे मीच (अजय) गायलो.

इतर संगीतकारांकडे प्लेबॅक करताना काय वाटते?
-
इतरांकडे गाताना मी (अजय) त्या संगीतकारांच गाणं माझ्या आवाजाने कसं खुलवता येईल आणि कसे यशस्वी करता येईल त्याकडे लक्ष असते.

मुंबईत आल्यानंतर करीयर घडविण्यासाठी कोणी साथ दिली?
-
सुरुवातीला संगीत संयोजन करत होतो, नंतर मात्र राज ठाकरे या व्यक्तिमुळे काम मिळाले. ‘विश्वविनायकनंतर 2 वर्षे काहीच काम नव्हते आणि नंतर राज साहेबांना ते ऐकवल्यानंतर त्यांनी साजिद नाडियादवालाकडे आमच्यासाठी शब्द टाकला.

आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल संतुष्ट आहात?
-
होय. त्याने (वर बघून) आत्तापर्यंत भरभरून दिले आहे. पुढील आयुष्यात इतकं काम करायचं आहे की लोकांनी आम्हाला चांगले संगीतकार चांगले व्यक्तिमत्व म्हणून ओळखावं.