Sunday, 28 September 2014

असे असावे अजय-अतुल सरांचे फॅन...

आज अजय अतुल सरांनी माझ्यासाठी खूप काही केले आहे. मी प्रथमता: मराठीमध्ये अजय-अतुल सरांची वेबसाईट असावी अशी अशा व्यक्त केली. तत्क्षणी मला सरांचा दुजोरा मिळाला.. आज अजय-अतुल सरांची www.ajayatul.in हि वेबसाईट दुसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे. या वेबसाईट मध्ये अजय-अतुल सरांच्या बाबत ओतप्रोत देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे.  अजय-अतुल सरांच्याच फॅन-क्लब ने Ajay-Atul Online फेसबुक पेज जबरदस्त पद्धतीने तयार केले आहे. त्यामुळे आणखी या कामाला वेग आला आहे. त्यातलाच एक प्रसाद सोनावणे या अजय-अतुल सरांच्या फॅन ने माऊली या थीम वर जबरदस्त सॅन्ड आर्ट केली आहे. ती आर्ट या निमित्ताने आपणासर्वांना सविनय सादर....