Sunday, 28 September 2014

असे असावे अजय-अतुल सरांचे फॅन...

आज अजय अतुल सरांनी माझ्यासाठी खूप काही केले आहे. मी प्रथमता: मराठीमध्ये अजय-अतुल सरांची वेबसाईट असावी अशी अशा व्यक्त केली. तत्क्षणी मला सरांचा दुजोरा मिळाला.. आज अजय-अतुल सरांची www.ajayatul.in हि वेबसाईट दुसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे. या वेबसाईट मध्ये अजय-अतुल सरांच्या बाबत ओतप्रोत देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे.  अजय-अतुल सरांच्याच फॅन-क्लब ने Ajay-Atul Online फेसबुक पेज जबरदस्त पद्धतीने तयार केले आहे. त्यामुळे आणखी या कामाला वेग आला आहे. त्यातलाच एक प्रसाद सोनावणे या अजय-अतुल सरांच्या फॅन ने माऊली या थीम वर जबरदस्त सॅन्ड आर्ट केली आहे. ती आर्ट या निमित्ताने आपणासर्वांना सविनय सादर....

Sunday, 15 June 2014

अजय-अतुल सरांनी तयार केलेल्या "लई-भारी " चित्रपटाच्या म्युसिक चे अनावरण


तुला साद आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली ..!!- लई भारी

विठ्ठल,विठ्ठल,विठ्ठल,विठ्ठल, विठ्ठल,विठ्ठल,विठ्ठल,विठ्ठल 
तुला साद आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली ..!!

वसा वारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवांटी तुझी सावली

गळाभेट घेण्या भिमेची निघाली तुझ्या नामघोषात इंद्रायणी ...!!

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ...!!!
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली …!!!
तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी
जीवाला तुझी आस का लागली ?
जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माउली …!!!

माउली माउली माउली माउली माउली माउली रूप तुझे !!! - २

चालतो रे  तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावलांनी वसा या  !!
टाळ घोषांतुनी साद येते तुझी दावते वैष्णवांना दिशा …!!!
दाटला मेघ तू सावळा , मस्तकी चंदनाचा टिळा
लेउनी तुळशीमाळा गळा या दावसी वाट त्या राउळा
आज हारपले देहभान जीव झाला पुरा बावळा
पाहण्या या तुझ्या लोचनात भाबड्या लेकरांचा लळा
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली …!!!
तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी
जीवाला तुझी आस का लागली ?
जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माउली …!!!

माउली माउली माउली माउली माउली माउली रूप तुझे !!! - २

विठ्ठल.... विठ्ठल … विठ्ठल … विठ्ठल
चालला गजर … जाहलो अधीर … लागली नजर कळसाला
पंचप्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला …
देखिला कळस … डोईला तुळस … दावितो चंद्रभागेसी …
सामिपही दिसे पंढरी… याच मंदिरी… माउली माझी …
मुखदर्शन व्हावे आता । तू सकळ जगाचा त्राता
घे कुशीत या माउली तुझ्या पायरी ठेवितो माथा …
विठ्ठल विठ्ठल … विठ्ठल … विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल … विठ्ठल … विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल … विठ्ठल … विठ्ठल
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल … श्री नामदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज कि जय !!!
Song : Mauli Mauli
Music - Ajay Atul 
Lyrics - Guru Thakur 
Movie : Lai Bhari



Friday, 13 June 2014

चला लई भारी चित्रपट येतोय...लई भारी ढंगात...

बऱ्याच दिवसांनी येते पण मराठी संगीतामध्ये थिरकावून  सोडणारी मराठी जोडी अजय -अतुल आता घेऊन येतायेत लई-भारी  गाणी हि गाणी आता उपलब्ध होणार आहेत.
www.ajayatul.in या वेबसाईटवर....


Monday, 10 February 2014

हे फँड्रीऽऽऽ.... तुझ्या पिरतीचा इंचू मला चावला....

११ फेब्रुवारी २०१४ :

जीव झाला येडा-पिसा,रात-रात जागणं...
पुरं दिस-भर,तुझ्या फिरतो मागं-मागणं...
जादू मंतरली कुणी,सपनात जागपनी,
नशिबी भोग असा दावला...
तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला...
तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला...
मागं पळून पळून, वाट माझी लागली,
अनं तू वळून बी माझ्याकडे पाहीना...
भिर भिर मनाला ह्या घालू कसा बांध गं...
अवसेची रात मी, अनं पुनवंचा तू चांद गं...
नजरेत मावतीया, तरी दूर धावतीया...
मनीचा ठाव तुझ्या मिळणा...
आता थोरा-मोरं घास तरी गीळणां...
देवा जळून-जळून जीव, प्रीत जुळणां हं...
सारी इस्कटून जिंदगी मी पाहिली,
तरी झाली कुठं चूक मला कळणां...
सांभी कोपऱ्यात उभा एकाला कधीचा,
लाज ना कशाची, तक्रार नाही...
भास वाटतोया, हे खर का सपान,
सुखाच्या ह्या सपनाला थार नाही...
हे रात झाली जगण्याची हाय तरी जिता,
होय प्रेम माझं, अन भाबडी कथा...
बघ, जगतूया कसं, साऱ्या जन्माचं हसं,
जीव चिमटीत असा गावला...
तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला...
तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला...
मागं पळून पळून, वाट माझी लागली,
अनं तू वळून बी माझ्याकडे पाहीना.

दु:खाचीही नशा अनुभवली....

दोन वर्षांनी पुन्हा नव्या जोमात मराठी सिनेमांकडे वळले अजय-अतुल. वैयक्तिक दु:ख (सरांचे वडील- अशोक गोगावले यांची देवाज्ञा -११ डिसेंबर २०१३) बाजूला ठेवत त्यांनी "फँड्री" सिनेमासाठी "पिरतीचा इंचू मला चावला" हे गाणं केलं. या प्रसिध्द संगीतकार जोडीशी केलेली ही बातचीत...